आमच्या विषयी

प्रस्तुत संकेतस्थळाच्या प्रवर्तकांविषयी......

       श्री श्रीनिवास वा. गोगटे हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंट्ण्ट आहेत.परंतु समाजकार्याची जाणीव त्यांनी अखंड ठेवली आहे. ‘श्री चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थेचे ते संस्थापक असून स्वरूप सावली जल संजीवन हे व्यापक जनहिताचे उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविले आहेत. श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेशी त्यांचा सबंध बालपणापासूनच आला त्यातूनच लोकमान्य टिळक हे त्यांचे आदरस्थानच नव्हे तर प्रेरणास्थानही ठरले आहे. टिळकांचे कार्य व्यापक मोलाचे असूनही त्यांच्याविषयी विशेषत: तरुण पिढीला फारशी माहिती नाही ती करून देणे आवश्यक आहे या जाणिवेतूनच लोकमान्यांविषयी माहितीपूर्ण अशी वेबसाईट निर्माण करण्याची कल्पना त्यांना स्फुरली.

या कल्पनेला पुष्टी देण्याचे कामजोत्स्ना प्रकाशनचे  श्री विकास . परांजपे यांनी चोख बजावले. विज्ञानाचे पदवीधर असूनही श्री. परांजपे यांचा ओढा साहित्याकडे अधिक राहिला आहे. टिळकांच्या चरित्राचा व्यापक अभ्यास त्यांनी केला असून अनेक नामवंत समीक्षक, प्रज्ञावंत व साहित्यिक यांच्या प्रत्यक्ष संपर्कामुळे टिळकांविषयीचा त्यांचा आदर वृद्धिंगत झाला आहे.

श्री विनायक जोशी यांचा  मुख्य  परिचय म्हणजे टिळक चरित्राचा त्यांच्याविषयी प्रकाशित झालेल्या साहित्याचा  त्यांचा सूक्ष्म अभ्यास. श्री जोशी यांना टिळकभक्त म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. त्यांच्या अफाट व्यासंगाचा मोठा आधार या संकेतस्थळास मिळत आहे.

श्री विजय . जोशी हे  इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असून  तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्र या विख्यात संस्थेमध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून व्यतीत केला आहे. टिळकांची मूलगामी विचारशक्ती, असामान्य बुद्धिमत्ता कर्मयोगाचे अथक आचरण या गोष्टींचा प्रभाव त्यांच्यावर पडला. या महान व्यक्तिमत्वाची ओळख आजच्या तरुण पिढीला व्हावी या भावनेतूनच ते या संकेतस्थळासाठी हातभार लावत आहेत.

श्री सोहम विवेक ठाकूरदेसाई हा पंचविशीचा तरुण या प्रकल्पामध्ये हिरीरीने सामील झाला आहे. व्यवसायाने संगणक अभियंता असूनही लोकमान्य टिळकांचे चरित्र भारताचा इतिहास हे विषय श्री ठाकूरदेसाई यांच्या विशेष अभ्यासाचे आहेत. त्यांच्या योगदानामुळे हे संकेतस्थळ तरुणांनाही उद‍्बोधक  प्रेरणादायी ठरेल असा विश्वास आम्हाला वाटतो.

या व्यतिरिक्त अनेक क्षेत्रातील नामवंत अभ्यासू व्यक्तींची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत या संकेतस्थळाच्या निर्मितीसाठी लाभली आहे ही गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते. स्थलमर्यादेमुळे या सर्वांचा नामोल्लेख करता आला नाही.

 

Advertisement

  • even news-new
  • even news-new