♦ स्वतः आचरलेल्या निष्काम कर्मयोगाला उज्ज्वल चारित्र्य व अफाट व्यासंगाची जोड देणारे अर्वाचीन भारतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व !
♦ राजकारण, समाजकारण, अर्थकारण व पत्रकारिता या चारही क्षेत्रात आपला चिरंतन ठसा उमटविणारा भारतातील पहिला लोकनेता !
♦ राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी, स्वराज्य व बहिष्कार या चतुःसूत्रीचा पुरस्कार करून स्वराज्याच्या चळवळीचा पाया भरणारा द्रष्टा.
♦ गणित, खगोलशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, भाषा, कायदा अशा विविध विषयांचे मूलगामी अभ्यासक आणि भगवत् गीतेवरील आधुनिक भाष्यकार !
♦ “तेल्यातांबोळ्यांचे पुढारी”, “भारतीय असंतोषाचे जनक”, “भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची आकांक्षा निर्माण करणारे व पर्यायाने आशिया खंडात ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणारे पहिले नेते व आधुनिक भारताचे निर्माते”!
♦ अशा अलौकिक व्यक्तिमत्वाचा व स्फूर्तिदायी चरित्राचा हा सर्वंकष मागोवा.